सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे बाराबंदी परिधान करून शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यात सहभागी होणार

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज, बाराबंदी, शेंगा पोळी, बाजरी आणि ज्वारीची भाकरी देऊन दिले क्रीडामंत्र्यांना निमंत्रण

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे काही काळ सोलापूरचे पालकमंत्री होते त्यांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे निमंत्रण देताना किसन जाधव यांनी योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज, शेंगापोळी, बाजरी, ज्वारीची भाकरी आणि बाराबंदी पोशाख ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा,शाल,फेटा आणि पुष्प हार घालून नूतन क्रीडामंत्री यांचा इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीदीप दत्तात्रय भरणे यांनी देखील यावेळी किसन जाधव यांनी शाल पांघरून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित त्यांनी बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र… बोला… हर्र श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयचा घोष केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सरचिटणीस अमोल जगताप, शहर संघटक माऊली जरग, शहर संघटक माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, महादेव राठोड दीपक आरगेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर हे समतेचे प्रतिक म्हणून ओळखले जातात बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांबरोबर त्यांनी केलेले काम फार मोठे आहे सामाजिक समता आणि समरसता निर्माण करण्याची कामगिरी शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी बजावली आहे सोलापूरला पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी सहा तलावांची निर्मिती, ६८ लिंगांची स्थापना, अष्टविनायक आणि काळभैरवाच्या मंदिराची निर्मिती देखील शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी केली आहे.

यात्रा कालावधीला अष्टविनायकांच्या दर्शनाने सुरुवात होते आणि त्यानंतर मानकरी यांना मान दिला जातो सोमवारी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोळहा पार पडतो हा सोहळा यात्रेचा मुख्य गाभा आहे अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

याशिवाय देश पातळीवरील दिग्गज नेते कलावंत हेही हजेरी लावतात यात्रा कालावधीत मानकरांसाठी बाराबंदी हा पांढरा शुभ्र पोशाख असतो तो पोशाख क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना किसन जाधव यांनी देऊन यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे त्याबरोबरच अस्सल सोलापुरी खाद्य संस्कृती असलेली शेंगापोळी बाजरी ज्वारीची कडक भाकरी ही त्यांनी दिलेले आहेत

यात्रा कालावधीमध्ये खीर शेंगापोळी बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीला मोठा मान आहे किसन जाधव यांच्या निमंत्रणानंतर क्रीडामंत्री भरणे यांनी मी यात्रेत सहभागी होणार असल्याचे सहमती दिली आहे यामुळे ते यात्रेतील अक्षता सोहळ्याला आवर्जून हजेरी लावणार असल्याचे हे किसन जाधव यांनी सांगितले.बाराव्या शतकामध्ये समता बंधुता जाती निर्मूलन, जलसंवर्धन, पर्यावरण, संरक्षण याची महती शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी दिलेले आहे.

खऱ्या अर्थान शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा ही समतेची यात्रा आहे ही यात्रा तमाम विश्वाला माणुसकी बंधूता याची शिकवण देणारी आहे यामुळे मी यात्रेत सहभागी होणार आहे असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या सदस्यांना तसेच सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!