निर्झरा केअर फाऊंडेशन च्या कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घघटन

सोलापूर : प्रतिनिधी
श्रीश्रीश्री १००८ काशी जगद्गुरू मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी, होटगी संस्थान मठ यांच्या शुभआशिर्वादाने निर्झरा केअर फाऊंडेशनच्या वतीने बोरामणी येथील कै. सिध्दाराम व्ही. साखरे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेचे उद्घघाटन मोठया उत्साह पूर्ण वातावरणात झाले
या कुस्ती स्पर्धा श्री सिध्देश्वर आखाडा, किल्ला बाग, पार्क चौक, सोलापूर येते झाल्या यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष स्वाती अळीमोरे, हिंद केसरी व DYSP सुनिल साळुंखे, बठाण महाराष्ट्र केसरी पै. समाधान घोडके, जलसंपदाचे माजी सचिव चन्नवीर बिराजदार, राज साळुंखे अण्णासाहेब रोडगे, पै राजाभाऊ देशपांडे, पांडुरंग चौगुले, मल्लिनाथ पटने, दत्तात्रय कोलारकर, नागनाथ पाटील, श्रीकृष्ण कुस्ती केंद्र संस्थापक पै.भरत मेकाले, मोहन पाटील सोमनाथ ओळळी मोरे, महावितरण चे लामतुरे साहेब, वाहतूक शाखेचे निरीक्षक अजित पाटील, प्रांजल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धा 25 ते 30 31 ते 35 36 ते 40 41 ते 45 46 ते 50 51 ते 55 56 ते 60 61 ते 65 66 ते 70 71 ते 75 76 ते 80 80 ते 85 81 ते 90 91 ते 110 या वजन गटात झाल्या रविवारी दिनांक 12 रोजी भव्य अशा महिलांच्या कुस्ती स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले आहे. .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मस्के यांनी केले तर आभार भारत मेकाले यांनी केले या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य अशा महिलांच्या कुस्ती स्पर्धा झाल्यानंतर होणार आहे.