गुणवंत शिक्षण विस्ताराधिकारी पुरस्काराने बापूराव जमादार यांचा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सन्मान

सोलापूर : प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्तर सोलापूर ते माजी गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांचा सन्मान सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक कादर शेख यांचे शुभ हस्ते संपन्न झाले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल कोरे, सचिव सोमनिंग कोळी, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार आदी मान्यवरांच्या हस्ते निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये संपन्न झाला. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे प्रवेश कामकाज, शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा कार्यशाळा तसेच तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी नान्नज बीट मधील विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय किशोरी मेळावा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, हरघर तिरंगा विद्यार्थी गुणवत्ता विकास, आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्त अकरा कोटी सूर्यनमस्कार संकल्प मध्ये सक्रिय सहभाग, बाबत विविध उपक्रम उत्कृष्टरित्या राबवणारे बापूराव शंकर जमादार यांचे कार्याची दखल घेऊन सोलापूर जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटना तसेच बहुजन शिक्षक पतसंस्था यमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या सहयोगाने राष्ट्रमाता जिजाऊं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त विविध पुरस्कार शिक्षक व इतर क्षेत्रातील सर्व मान्यवरांना देण्यात आले.
सोलापूर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून बापूराव जमादार काम करत आहेत याप्रसंगी, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, केंद्रप्रमुख मल्लिनाथ निम्बर्गी, विशाल शिरसटराव, प्रकाश राचोट्टी, विविध संघटनेचे पदाधिकारी प्राध्यापक अंजना गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते श्री जमादार यांच्या निवडीबद्दल अनेक संघटना तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन असं होत आहे.