सोलापूरक्राईममहाराष्ट्र

१ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा, सोलापुरातील दिग्गज राजकारण्यांचा समावेश मात्र..

सुरत, रत्नागिरी, बीड सह सोलापुरातील ३८ जुगाऱ्या विरोधात गुन्हा दाखल, ६ चारचाकी, ४० मोबाईल सह सव्वा दोन लाख रुपयांची रोख रक्कम जप्त

सोलापूर : अनगर (ता.मोहोळ)

मोहोळ येथील लोकनेते पॅलेस या दुमजली जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली असता यावेळी २ लाख २६ हजार रुपयांची रोकड आणि ६ चारचाकी वाहने, ४० मोबाईल अशी १ कोटी ३ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि परि.सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वखालील पोलीस पथकाने मंगळवार रात्री पावणे नवू वाजण्याच्या सुमारास लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला.

लोकनेते पॅलेस येथील बंद खोल्यामध्ये जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 4, 5 प्रमाणे फिर्यादी पोलिस सुनील मोरे यांच्या फिर्यादी वरून रियाज बासु मुजावर, विनायक निलकंठ ताकभाते, फारुख शेख याकुब, मितीन सारंग गुंड, ओंकार विजय चव्हाण, राजू लक्ष्मण भांगे, महादेव बंडोबा पवार, मनोज नेताजी सलगर, स्वप्निल प्रविण कोठा, रोनक नवनीत मर्दा, हर्षल राजेंद्र सारडा, कृष्णा अर्जुन काळे, अनिल किसन चव्हाण, धानप्पा प्रकाश भदरे, अबरार करीम फकीर, लखन जगदीश कोळी, सोमनाथ दादासाहेब मोरे, महादेव मुरलीधर दगडे, राम बलभिम कदम, कृष्णा कल्याण राऊत, विलास धर्मराज कडेकर, सुशिल कैलास लंगोटे, तर दुसऱ्या मजल्यावर दिपक चंदकांत गायकवाड, राजू हसन शेख, आयाज इब्राहिम सय्यद, दिनेश सुखदेव चवरे, बालाजी केरबा भोसले, ओंकार नेहरु बरे, आप्पा सिद्राम पाटील, एकनाथ भगवान चांगीरे, विशाल रघुनाथ क्षीरसागर, संभाजी सोपान कवितकर, फिरोज बाबू शेख, सिताराम रामचंद्र कुंभार, सज्जन लक्ष्मण शेळके, गोविंद महादेव पाटील, प्रशांत प्रकाश पाटील, सोमनाथ भिमराव जोकारे, हे गोलाकार बसून ५२ पत्यांचे पानांवर तिरट नावाचा जुगार खेळ असताना मिळून आले आहेत. त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे कायदेशिर फिर्याद दिली आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस फौजदार घोळवे हे करत आहेत.

यावेळी महिंद्रा थार,महिंद्रा एक्स यू व्ही, स्विप्ट डिझायर, फोक्स वॅगन अशा ६ चारचाकी गाड्या, आणि १४ लाख ११ हजार रुपये किमतीचे ४० मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ३ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!