अतुल कुलकर्णी सोलापूरचे नूतन पोलीस अधिक्षक, धाराशिव मधील दबंगिरी नंतर सोलापुरातील कामगिरी कडे लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील 29 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काढला आहे त्यामध्ये सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची लाचलुचपत विभाग पुणे अधीक्षक पदी तर त्यांच्या जागी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यामध्ये सोलापूर मध्ये कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर त्यांच्या जागी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडूकर यांची सातारा पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते दरम्यान राज्यातील 29 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या चा आदेश काढण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे
पंकज शिरसाट (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), अतुल झेंडे (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), रूपाली खैरमोडे (पोलि अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), विनायक नरळे (अपर पोलिस अधीक्षक, पालघर), अभिजीत शिवथरे (अपर पोलिस अधीक्षक, रायगड), राहुल माकणीकर (पोलिस उपायुक्त, ९ नागपूर), लक्ष्मीकांत पाटील (पोलिस अधीक्षक, सायबर सुरक्षा, ९ मुंबई), विजयकांत सागर (पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई), वैशाली कडूकर (अपर पोलिस अधीक्षक सातारा), दिपाली धाटे (पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई), सुरज गुरव (अपर पोलिस अधीक्षक, नांदेड)
• अतुल कुलकर्णी : सोलापूर पोलिस अधीक्षक
• श्रीकृष्ण कोकाटे : हिंगोली पोलिस अधीक्षक
• सुधाकर पठारे : सातारा पोलिस अधीक्षक
• अनुराग जैन : वर्धा पोलिस अधीक्षक
• विश्व पानसरे : बुलढाणा पोलिस अधीक्षक
• शिरीष सरदेशपांडे : ९ पुणे पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
• संजय वाय. जाधव धाराशिव पोलिस अधीक्षक
• कुमार चिंता : यवतमाळ पोलिस अधीक्षक
• आंचल दलाल : राज्य राखीव पोलिस बल गट क्र. एक समादेशक (२) पुणे)
• नंदकुमार ठाकूर : प्राचार्य, पोलिस प्रशिक्षक केंद्र, दौंड
• निलेश तांबे : प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
• पवन बनसोडे : पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती
• नुरुल हसन : समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ११, नवी मुंबई
• समीर शेख : पोलिस उपायुक्त, ९ मुंबई शहर
• अमोल तांबे : पोलिस अधीक्षक, दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
• मनिष कलवानिया: पोलिस उपायुक्त, मुंबई शहर
• अपर्णा गिते : कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्याटि मुंबई
• दिगंबर प्रधान : पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ९ तारापूर