वैद्य यांचे तिन्ही उमेदवारी अर्ज वैध, दक्षिणची निवडणूक लढणार आणि जिंकणार, उमेदवारी मागे घेणार याचा घेतला कडक समाचार

सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ॲड सोमनाथ वैद्य यांनी पाच महिन्यापासून काम करतोय प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केले आहेत. सुरुवातीपासूनच अपक्ष म्हणून तयारी केली आहे कोणत्याच पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही परंतु भाजपाच्या सात ते आठ नगरसेवकांनी पाठिंबा दिला त्यामुळे भाजपमधून सोमनाथ वैद्य इच्छुक होते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि संसदीय बोर्डाच्या कमिटीने तिकीट नाकारले आणि सुभाष देशमुख यांना तिकीट दिले त्यांचेही अभिनंदन केले परंतु मला ही घटनेने अधिकार दिले आहे.
घटनेनुसार मी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले तिन्ही अर्ज वैध झाले चार तारखेची वाट पाहतोय चार तारखेला दुपारी चिन्ह मिळाले की ते पाच तारखेला 24 तासाच्या आत दक्षिण सोलापूर तालुक्याच्या मतदारांपर्यंत साडेतीन लाख लोकांपर्यंत चिन्ह पोहोचणार आहे माझे सर्व नियोजन झालेल आहे.
वीस वर्षझालं मंत्रालयात काम करतोय पाच टर्म निवडणुका पाहिल्या आहेत मला घटनेने अधिकार दिलेला आहे सुप्रीम कोर्टात काम केले आहे मी स्वतः वकील आहे मी प्रचंड काम केलेल आहे सोलापूर मध्ये अशा काही एजन्सी आले आहेत या राजकारण्यांनी त्यांना पैसे देऊन चर्चा करतात सोमनाथ वैद्य अर्ज मागे घेतात अशा पद्धतीने अफवा पसरवत आहेत. आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, मी उभारणार अपक्ष लढवणार दक्षिण सोलापूरच्या मतदारांना न्याय मिळावा 24 असा उपलब्ध असणारा आमदार व्हावा यासाठी ही लढाई लढणार आहे. मंत्रालय विधान भवन हे मी वयाच्या 23 वर्षापासून पाहतो त्यामुळे मला हे नवीन नाही.
सर्वसामान्य जनतेची कामे व्हावी 24 तास आमदार उपलब्ध व्हावा यासाठी मी ही कामे करणार आहे जनतेने संभ्रमात राहू नये अशा खोट्या माहिती किंवा बातमी पसरली जाते मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही मी शंभर टक्के लढवणार आणि जिंकणार असा विश्वास दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ॲड सोमनाथ वैद यांनी व्यक्त केला.