भिक्षूना अभ्यंगस्नान घालून भेटवस्तूंचे वाटप, आस्था संस्थेचा कार्यक्रम, उपक्रमाचे १० वे वर्ष

सोलापूर : प्रतिनिधी
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने शिवानुभव मंगल कार्यालयात शहरातील भिधुंना अभ्यंगस्नान घालून दिवाळी साजरी करण्यात आली.
या प्रसंगी एकूण ५० पुरुष व ५० महिलांना दिवाळीचे फराळ, कपडे, तेल, साबण, उटणे, चिवडा, लाडू, शंकरपाळी, मिठाई बॉक्स व फटाके देण्यात आले. माजी सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे, सामाजिक कार्यकर्ते श्रीशेल बनशेट्टी, देविदास चेळेकर, आस्था संस्थेचे सल्लागार हर्षल कोठारी, अध्यक्ष आनंद तालीकोटी, प्रसिध्दी प्रमुख सुहास छंचुरे, संचालक योगेश कुंदुर, वेदांत तालीकोटी, सिद्धू बेऊर, सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी गजानन भरले व परिवार, दाळगे प्लॉट नवरात्र मंडळ, श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा, सीईओ देवई शहा, प्राचार्य विलास लेंगरे, कांचन आगावणे, प्रा. शरण वांगी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी प्रशांत छंचुरे, सुरज छंचुरे, श्रीनाथ घोंगडे, प्रथमेश गावडे, उदय छंचुरे, योगीराज आरळीमारत यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले. योगेश कुंदुर यांनी आभार मानले.