आर आर आबांच्या डान्सबार बंदी कारवाईची झाली आठवण, डान्सबार पब ऑर्केस्ट्रा बार 100% बंद झाले पाहिजे : उमेश पाटील

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान आपली वैयक्तिक स्पष्ट भूमिका महाराष्ट्र समोर मांडली. यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्षातील वरिष्ठांशी या विषयावर चर्चा केली नाही राज्यातील सत्ताधारी नेत्यांबरोबर देखील चर्चा झाली नाही, माझी वैयक्तिक भूमिका आहे राज्यातील डान्सबार बंद झाले पाहिजे.
ज्या पद्धतीने आर आर आबांनी डान्सबार बंदी केली त्या पद्धतीने जो कायदा करायचे तो करा, केंद्र सरकारच्या पातळीवर कायदा करा, तो कायदा असा करा की ती लोक कोर्टात गेली तरी निकाल हा डान्सबार बंदीच्या बाजूने लागला पाहिजे. निकाल उलटा लागला नाही पाहिजे, तरुण पिढी उध्वस्त होत चालली आहे डान्सबार आणि पब मध्ये श्रीमंतांची पैसे उडण्याची पद्धत पाहून मध्यमवर्गीयांमध्ये एक आकर्षण निर्माण होत आहे.
पुढची पिढी वाचवायचे असेल तर हे डान्सबार आणि पब 100% बंद झाले पाहिजे साधे हॉटेल चालवा डान्सबार पब आणि हे ऑर्केस्ट्रा बार देखील बंद झाले पाहिजे, ही माझी व्यक्तिगत भुमिका असल्याचे उमेश पाटील यांची सांगितले.