पृथ्वीराज नरोटे युवा मंच वतीने 25 अहिल्यादेवी च्या मूर्तींचे वाटप, अहिल्यादेवीची जयंती गावो गावी साजरी व्हावी यासाठी समाज उपयोगी उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील जन्मोत्सव मंडळाना पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे वाटप करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती निमित्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जनमोत्सव मंडळांना पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंच यांच्या वतीने शिवाजी महाराज पिसे व सुभाष पैलवान नरोटे यांच्या स्मरणार्थ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 25 मूर्तीचे वाटप दिनांक 28 मे 2024 रोजी दुपारी 11 वाजता फडकुले सभागृह, पार्क चौक, सोलापूर येथे होणार आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
तरी जे मंडळ उत्सव साजरा करणार आहेत ज्या मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूतींचा उत्सव साजरा करायचे आहे. अश्या मंडळांनी नाव नोंदणीसाठी खलील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पृथ्वीराज चेतन नरोटे यांनी केले.
पृथ्वीराज नरोटे- ९८३४९०८४९४
शैलेश पिसे- ९९२२७१००८८
बापू वाघमोडे- ९८५०२८२३९३
राज सलगर- ९०९६१३८२७८
चर्मराज गुंडे- ९३०७१९४३४३
महेश गाडेकर- ९८२२६६०६०५
या पत्रकार परिषदेत आप्पा सलगर, रुपेश गायकवाड, महेश गाडेकर, पद्माकर दळवी, गणपा कटरे आदींसह युवा मंच पदाधिकारी उपस्थित होते.