1, 2 जून रोजी सोलापूरात जिल्हास्तरीय बालमहोत्सव, बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महोत्सवाचे आयोजन : कुमार करजगी

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने १ व २ जुन २०२४ रोजी दोन दिवसांचा जिल्हास्तरीय बाल महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव नागेश करजगी ऑर्चिड स्कुल, जुनी मिल कंपाउंड येथे संपन्न होणार असुन त्याचे उद्घाटन प्राचार्य शंकर नवले, सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज यांचे हस्ते व आर.के. जाधव, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली तसेच कुमार करजगी, प्राचार्य नरेश बोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती ही बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राज्य पातळीवर काम करणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना १९५० मध्ये झाली आहे. ही संस्था भारतीय बाल कल्याण परिषद, नवी दिल्ली या संस्थेशी संलग्न आहे. मुलांमधील सर्जनशिलता वाढीस लागावी आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व हसत खेळत फुलावे यासाठी अनेक उपक्रम संस्थेने यशस्वीपणे राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून संस्थेने सोलापूर जिल्हास्तरीय बाल महोत्सव १ व २ जुन २०२४ रोजी शनिवार रविवार सोलापूरात आयोजित केला आहे.
या महोत्सवात टाकाऊतून टिकावू, ओरीगामी, जादूचे प्रयोग, गणितातील गमती-जमती, पथनाट्य व नाटुकल्या, चित्रकला, शेती, विज्ञान जाणून घेवू, बालकांमध्ये प्रेम व एकात्मता वाढविणारे खेळ, निरनिराळी गाणी आदी अनेक विभाग आहेत. शिवाय पहिल्या दिवशी अंधार पडल्यानंतर कॅम्प फायर व आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. एकूण बालकांचा जल्लोश यानिमित्ताने होणार आहे. सदर बाल महोत्सव यशस्वी करणेसाठी प्रा. मिरा शेंडगे, प्रा. एस. बी. खळसोडे आणि सावित्री महिला संघटना, सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.