थाळी वाजवून नव्हे, तर रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय सुस्त झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार नाही.

सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी सोलापूरकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.
पाण्याचा दिवस हा कलंक पुसण्यासाठी सोलापूरकरांनी थाळी नाद आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे. वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेच्या निष्क्रिय आणि उदासीन कारभारामुळेच गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरकर पाण्यासाठी वन वन भटकत आहेत हे वास्तव सत्य असतानाही या अधिकाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याऐवजी स्वतःच्या घरातून थाळी वाजवून या अधिकाऱ्यांना कशी जाग येणार हा खरा प्रश्न असून सध्याच्या या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोणताही प्रश्न थाळी वाजवून सुटणार नाही तर तो रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय आवाज उठवल्याशिवाय सुटणार नाही.
हे त्रिकाल बाधित सत्य असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा कानमंत्र भारतीयांना दिला असताना सुद्धा सध्याच्या या इंटरनेटच्या युगात सोलापूर विकास मंचने महापालिकेच्या विरोधात नागरिकांना थाळी नाद करण्याचे केलेले आवाहन निश्चितच अद्यानाकडे टाकलेले पाऊल आहे.
सोलापूर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना खोट्यावधी रुपये पाणी पुरवठ्यासाठी खर्च होतात परंतु सोलापूरकरांना पाणी मिळत नाही पाण्यावर पडत असलेला हा दरोडा थांबवण्यासाठी तमाम सोलापूरकरांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला धारेवर धरले पाहिजे आणि असेच आवाहन सोलापूर विकास मंचाने सुद्धा किंवा इतर संघटनांनी करून वजीरगुटावरून रस्त्यावर उतरले पाहिजे असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी केले आहे.