किसन भाऊंनी अजित दादांना दिला सोलापूर लोकसभेचा अहवाल, भाजपासोबत समन्वयाने काम केले, महायुतीचा उमेदवार विजयी होणार

सोलापूर : प्रतिनिधी
मुंबई येथील गरवारे क्लब हाऊस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीस राष्ट्रवादी पार्टीचे सर्व मंत्री, सोलापुरातील प्रमुख पदाधिकारी यांचे देखील उपस्थिती होती. यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक तथा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिपक साळुंखे पाटील, ज्येष्ठ नेते तथा आमदार बबनदादा शिंदे, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, दत्ता बडगंची, महेश कुलकर्णी, ओमकार हजारे, माणिक कांबळे, बापू सलवदे आदी प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 10 जून रोजी 25 वा वर्धापन दिन साजरा होणार असून या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जातील आणि आत्ताच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदार हे कौल देतील यामध्ये तिळमात्र शंका नाही मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार विजयी होतील असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
यावेळी सोलापुरातील प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लोकसभेचा अहवाल सादर करून संघटनात्मक चर्चा केली मोठ्या खेळीमेळी व उत्साही वातावरणात ही बैठक पार पडली.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यातील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.