दुःखद निधन.. बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय नेते राहुल सरवदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सोलापूर : प्रतिनिधी
अत्यंत कणखर, स्पष्टवक्तेपणा, रोखठोक स्वभाव आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून राहुल सरवदे यांची ओळख होती. बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने राहुल सरवदे यांनी रुजवली. राहुल सरवदे यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्थापने पासून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम साहेब तथा राष्ट्रीय अध्यक्ष बहिण मायावती यांचा सोबत कार्य केले. आंध्र, तेलंगणा व कर्नाटकचे प्रभारी पद यशस्वी रित्या सांभाळली. त्यांच्याच नेतृत्वात तेलंगणा मध्ये दोन आमदार देखील आले होते. त्यांनी मागील काळात BSP च्या माध्यमातून सोलापूर लोकसभा निवडणूक देखील लढवली होती.
आंबेडकरी चळवळीतील स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. त्यांच्या जाण्याने BSP पार्टी आणि संपूर्ण आंबेडकरी समाजात अत्यंत दुःखाचे वातावरण आहे. त्यांची अंत्ययात्रा आज त्यांच्या बुधवार पेठ येथील राहत्या घरापासून सायंकाळी चार वाजता निघणार आहे.