उठ दलिता हल्लाबोल, जितेंद्र आव्हाडावर हल्ला बोल, अशा घोषणा देत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना अटक करा : राजाभाऊ इंगळे

सोलापूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी आंदोलना वेळी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, उठ दलिता हल्लाबोल, जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झालीच पाहिजे, आदी घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या.
यावेळी बोलताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे म्हणाले, मनुस्मृतीचा समावेश शालेय पाठ्यक्रमात होऊ नये. जितेंद्र आव्हाड यांनी जे कृत्य केलेले आहे त्याबद्दल त्याचा निषेध असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अठरापगड जाती महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदत असताना कुठेतरी मनुस्मृतीचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात करून लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करू नये आणि जितेंद्र आव्हाडांना अटक करून त्याच्या कठोर कारवाई करावी. अशी मागणी ज्येष्ठ नेते इंगळे यांनी केली.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे, विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष अँड लोकिक इंगळे, अध्यक्ष अनिल सोनकांबळे, सरचिटणीस अंकुश मडखांब, युवक आघाडी जिल्हाप्रमुख महेश कांबळे, जिल्हा संघटक शाहू हत्तेकर, संगीता बिराजदार, शारदा वाघमारे, सैफन शेख, मैनोद्दिन बागवान, अजय मस्के, सुरज कोकरे, गौरव इंगळे, सुरज पाटील, आकाश काळे, रजाक शेख, आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.