शहर उत्तर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणे म्हणजे हास्यास्पद : सुनिल रसाळे
सुनिल रसाळे यांच्या पत्रकाने शहर उत्तरं मध्ये राजकिय चर्चेला उधाण

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाची जागा शरद पवार गटाच्या लोकांनी मागणी केलेली आहे. दोन वेळा डिपॉझिट जप्त झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी पक्षाने शहरातल्या पदाधिकाऱ्याने विधानसभा मतदारसंघाची मागणी केलेली आहे ही एक हास्यास्पद बाब आहे. त्याच शहरांमध्ये शरद पवार गटाची अवस्था अत्यंत बिकट आहे. अजित पवार पक्ष सोडून गेल्यामुळे अत्यंत बिकट अवस्थेत हा पक्ष चालत आहे.
अनेक वर्षापासून शहर उत्तर मध्ये काँग्रेस पक्षाने आमदारकी लढवली आणि निवडून आणली. 2009 पर्यंत काँग्रेस पक्षाने ही जागा अटीतटीने संभाळायचं काम केलेला आहे. 2009 साली काँग्रेस पक्षाने उभा केलेल्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीने त्यांच्या कार्यकर्त्यांना बंडखोरी करायला लावली आणि संपूर्ण राष्ट्रवादी बंद करायच्या पाठीमागे उभा केली आणि त्या वेळेसच नेमका धोका काँग्रेस पक्षाला पोहोचला आणि ही जागा काँग्रेस पक्षाच्या हातून भाजपा कडे गेली.
राष्ट्रवादीच्या बंडखोर वृत्तीमुळे भाजपाला खत पाणी मिळाले. तरीही काँग्रेस पक्षाने राजकीय तडजोड करून आणि सहनशीलता ठेवून ती जागा राष्ट्रवादीला सोडली. राष्ट्रवादी पक्षाने अति उत्साही नेत्यांना या मतदारसंघात उभे केले आणि आपलं स्वतःचं हस करून घेतले. दोन्ही वेळेस राष्ट्रवादीला आपले स्वतःचे डिपॉझिट सांभाळता आले नाही. आणि त्यावेळेस राष्ट्रवादी एक संघ होता. आज अजित पवार बाहेर पडल्यामुळे आणि शहरातले त्यातल्या त्यात शहर उत्तर मधील अनेक नेते बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.
एक महत्त्वाचे शरद पवारांनी सांगितलेला आहे. ज्या पक्षाचा पराभव दोन वेळा झालेला असेल त्यांचा तो मतदार संघ बदलावा. अशा अवस्थेमध्ये शहर उत्तर विधानसभा मतदार संघ स्थानिक नेते मागताय म्हणजे ही एक हास्यास्पद बाब आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये युवकांची ताकद वाढत आहे. ही बाब सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी प्रणिती शिंदे ची ताकद कशाप्रकारे वाढलेली आहे हे पाहिलेले आहे. मित्रपक्षाने देखील आपली स्वतःची ताकद ओळखून योग्य मागणी करावी. जेणेकरून आपला हसू होणार नाही. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मतदार विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवणार आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा तिरंगा फडकणार असे पत्रक काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनी काढले आहे.