पोलिस शेवटच्या क्षणी झाले भावनिक, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू, सेवानिवृत्ती नंतर नव्या आयुष्याची सुरुवात करा : एम राजकुमार

सोलापूर : प्रतिनिधी
पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर येथे आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आस्थापने वरील माहे मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करुन त्यांना त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुख समृध्दीचे जावो त्याबाबत मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने उपस्थित होते. यावेळी चार पोलिस अधिकारी व २१ पोलिस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, साडी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमामध्ये सहायक पोलिस आयुक्त नानासाहेब उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल भंडारी, पोलिस उपनिरीक्षक नरसप्पा राठोड, बाळासाहेब उन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक शमशोद्दीन शेख, हिराचंद राठोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी वसमाळे, पिरप्पा उटगे, राजेंद्र खारे, मौलाली पटेल, भारत सोरटे, श्यामराव गंभिरे, शिवलिंगप्पा बंदीछोडे, भारत शिवसिंगवाले, भगत शिवसिंगवाले, अंबादास शिंदे, उत्तम घोलप, धनंजय गरूड, उदयकुमार ठेंगले, दयानंद जावीर, रविकांत काळे, उमाकांत कदम, हवालदार श्रीकांत गरड, सुधीर हळदे, नागनाथ बिराजदार, काशीनाथ बेळगे यांचा सन्मान झाला.