दयानंद विधी महाविद्यालय माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा, स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
दयानंद विधी महाविद्यालयात गुरुवार ३० मे २०२४ रोजी माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास माजी विद्याथी संघटना अध्यक्ष ॲड बसवराज सलगर, जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंह राजपूत, सोलापूर बार असोशियनचे अध्यक्ष ॲड अमित आळंगे, ॲड मनोज पामुल, ॲड शरद पाटील, ॲड सुवर्णा कोकरे, ॲड अनिता रणशृंगारे, ॲड राजन दिक्षित, ॲड अजय रणशृंगारे, ॲड लक्ष्मण पाटील, ॲड धानय्या कपाळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्याक्रमाचे प्रास्ताविक व माजी विद्यार्थी मेळावा स्वरुप अपेक्षा याबाबतचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. सोनाली गायकवाड यांनी केले. प्रा.एम.डी. कटप यांनी आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास प्रा.रविंद्र चलवादी, प्रा. अरविंद देडे, डॉ. प्रवीण आडसकर, प्रा. रेखा मलजी, प्रा. पूजा हैनाळकर, श्री. अनिल प्याटी, श्री आनंद व्हटकर, श्री मनोहर सोमवंशी, श्री वीर रणशुंगारे आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.