राष्ट्रिय छावा संघटनेच्या वतीने श्रमिक पत्रकार संघास 32 इंची LED अँड्रॉइड टीव्ही भेट.
पत्रकार संघटनेसाठी आणि पत्रकारांसाठी सर्वतोपरी मदत करू : योगेश पवार

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून श्रमिक पत्रकार संघात सर्व पत्रकार कॅमेरामन फोटोग्राफर यांना टीव्ही पाहता यावा यासाठी 32 इंची एलईडी अँड्रॉइड टीव्ही पत्रकार संघटनेस भेट देण्यात आला. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे यांना छावा संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार यांच्या हस्ते टीव्ही भेट देण्यात आला. यावेळी संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राष्ट्रीय छावा संघटना आणि शिवसंदेश बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. पत्रकारांसाठी आणि पत्रकार संघटनेसाठी काहीतरी करण्याची अनेक वर्षापासून ची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. येणाऱ्या काळात पत्रकार संघटनेसाठी आणि पत्रकारांसाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही राष्ट्रीय छावाचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांनी दिली.
TV भेट देतेवेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार, नवी पेठेतील युवा व्यापारी राहुल गोयल, शहराध्यक्ष संजय पारवे, उत्तर तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील, आरिफ शेख, शिवसंदेश सामाजिक संस्थेचे प्रमुख विशाल पवार, ओंकार लोखंडे, यांच्यासह छावा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.