सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. महापालिका कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष वृत्तांत..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांचा जन्म 2 जून 1977 मुकुंद नगर भवानी पेठ सोलापूर येथे झाला. आजी जाईबाई विठ्ठल सदाफुले या सोलापूर महानगरपालिकेमध्ये झाडूवाली म्हणून कार्यरत होत्या. बाप्पुसाहेब सदाफुले यांच्या दोन्ही आत्या, चुलता, चुलती, यांनासुद्धा आजीनेच कामाला लावले.
वयाच्या पाच वर्षापासून आई सोबत कचरा भरण्यासाठी बाप्पु जाऊ लागले. अत्यंत गरिबीची परिस्थिती मध्ये बाप्पु लहान पनापासून घरासाठी मदत करत होते. आजीने आणि वडीलांच्या निधना नंतर बाप्पु अत्यंत गरिबीची हालाखीची परिस्थिती असताना आईने हाताला जे काम मिळेल ते कष्ट करून सर्वांना मोठे केले.
सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर कामगार नेते मुरलीधर पात्रे यांचा खूप मोठा दरारा महापालिकेमध्ये होता. त्यांच्या एका शब्दावर कुठलेही काम व्हायचे त्याचे कार्यकर्ते परमेश्वर तळभंडारे, अर्जुन दुडे, कॅप्टन गायकवाड हे त्यांचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिक होते. त्या वेळेस माझ्या मना मध्ये कामगार नेते मुरलीधर पात्रे यांच्या विषयी आदर निर्माण झाला.
आपण सुद्धा असाच एक कार्यकर्ता बनला पाहिजे अशी लहान पणापासून इच्छा होती. मुरलीधर पात्रे, जनार्दन शिंदे, अशोक जानराव, काशिनाथ थोरात यांचे काम बाप्पु सदाफुले जवळून पाहत होतो आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला कामगार नेते म्हणून सोलापूर शहरात प्रसिद्ध आहेत.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनची निर्मिती 2004 साली लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ट्रेड युनियनमध्ये बाप्पु सदस्य म्हणून अनेक वर्ष काम केले. कालांतराने लोकनेते राजाभाऊ सरवदे, संघटनेचे सचिव विठ्ठल सोनकांबळे यांनी बाप्पुला 2016 मध्ये ट्रेड युनियन अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. अध्यक्षपद घेतल्या नंतर महानगरपालिकेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले.
6 एप्रिल 1995 नंतरच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे त्याच अनुषंगाने युनियनचे काम मोठ्या इच्छाशक्तीने चालू केले यामध्ये विठ्ठल सोनकांबळे, राहुल मस्के, अविनाश मोहिते, अरुण मेत्रे, योहान कानेपागुल यांची अत्यंत चांगली साथ मिळाली. बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांची अंतिम स्वरूपाची यादी मंजूर करून घेऊन महापालिकेच्या बोर्डावर लावली यामध्ये महानगरपालिकेमधील अनेक पक्ष नेते नगरसेवक यांची चांगली साथ मिळाली.
आमदार प्रणिती शिंदे, चेतन नरोटे, अमोल शिंदे, बाबा मिस्त्री यांच्या माध्यमातून सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तात्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत 469 कर्मचाऱ्यांना सेवेत काम करण्यासंदर्भात 25 जानेवारी रोजी 2022 रोजी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे तात्कालीन पी शिवशंकर हे बैठकीस होते त्या बैठकीमध्ये नगर विकास खात्याचे अधिकारी उपस्थित होते बैठकीमध्ये एक मताने निर्णय घेण्यात आला. 6 एप्रिल 1995 नंतरच्या कर्मचाऱ्यांना एक खास बाब म्हणून सेवेत कायम करावे असे ठरले त्याच अनुषंगाने 2022 मध्ये 131 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून सेवेत कायम करण्यात आले. त्यातील उर्वरित बदली रोजंदारी कर्मचारी 249 व 16 वाहन चालक यांना सेवेत कायम करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त शितल तेली उगले यांनी 19 मे 2023 रोजी नगर विकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला. यामध्ये युनियनचे सर्व सहकारी, पत्रकार बंधू यांनी कामाची तळमळ बघून खूप मोलाची साथ दिली.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नही अशी भावना ठेऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड अध्यक्ष बाप्पुसाहेब सदाफुले यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करून वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्त मराठा व्हिजन न्यूजचा विशेष वृत्तांत..