राम सातपुते विजयी झाल्यानंतर 10 काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वखर्चातून आयोध्या राम मंदिर दर्शनास नेणार..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राम सातपुते आणि महाविकास आघाडी करून प्रणिती शिंदे यांच्यात लढत झाली. भाजपा आणि काँग्रेस कडून आमचेच उमेदवार कसा निवडून येनार याचे अंदाज बांधले जात आहेत. सोलापूर शहरातील उत्तर, मध्य, दक्षिण मतदार संघ, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर मंगळवेढा, मतदार संघातून भाजप आणि काँग्रेसला कोणत्या मतदार संघातून किती मतदान पडणार यावरून मतमतांतरे दिसून येत आहेत.
सोलापूर शहरात भाजपचा उमेदवार निवडून येणार का काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार यावरून कार्यकर्त्यांमध्ये पैज लावण्यात येत आहेत. कुणी जेवणाची पैज, कुणी पर्यटन फिरवून येण्याची पैज तर कोणी रोख रकमेची पैज लावल्याची चर्चा सोलापूर शहरात सुरू आहे.
भारतीय जनता पार्टी सोबत महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट यांच्यासह मित्रपक्ष असून काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मित्रपक्ष आहेत. यांनीही आपापल्या परीने लोकसभेत आपली कामगिरी बजावली.
फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम यासह सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तरे दिली. भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जशास तसे उत्तरे दिली. सोशल मीडियावर लोकसभा उमेदवारा बद्दल आक्षेपार्य पोस्ट टाकल्या प्रकरणी काही जणांवर गुन्हे देखील दाखल झाले.
फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम वर ऍक्टिव्ह असणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया चे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी खुले आव्हान दिले. महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे 30 ते 40 हजार मतांनी निवडून येणार असून ते विजयी झाल्यांनतर 10 काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वखर्चाने अयोध्या राम मंदिर येथे दर्शनास घेऊन जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया चे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी दिली.