वडिलांचा 2 झालेला पराभवाचा बदला लेकीने घेतला, प्रणिती शिंदे झाल्या खासदार

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल आज ४ जून रोजी जाहीर झाले. महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी ८० हजारहून मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आमदार आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. इतिहासातील निकालावर नजर टाकली तर येथे काँग्रेस पक्षाने अनेक दशके बाजी मारली. पण २००३ च्या पोटनिवडणुकीपासून या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकत आहे. आता प्रणिती शिंदे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे आणला.
या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अक्कलकोट, पंढरपूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा अशा सहा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसने प्रणिती शिंदें बद्दल सोलापूरची लेक अशी प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला. त्याच बरोबर राम सातपुते हे परके उमेदवार असल्याचा प्रचार काँग्रेसने केला. त्याच प्रणिती शिंदे यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात आघाडी देखील घेतली होती. काँग्रेसच्या विरोधात भाजपने या मतदारसंघात हिंदू कार्ड वापरले. सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट आणि पंढरपूर या विधानसभा मतदारसंघात राम सातपुतेंनी जोर लावल्याचे दिसले. येथील लिंगायत समाजाने प्रणिती शिंदेंना दिलेला पाठिंबा, त्याच बरोबर मंगळवेढा तालुक्यातील भगीरथ भालकेंची साथ यामुळे शिंदेंना फायदा होऊ शकतो. दुसरीकडे मराठा आरक्षणावरून फडणवीसांना झालेल्या विरोधाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वाटते. एकंदरीत सर्वदृष्टिकोनांनी पाहता निकाल हाती आला असून आमदार प्रणिती शिंदे 80 हजार च्या पुढील मताने निवडून आले आहेत.