माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रतिक्रिया, काय म्हणाले पहा..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विजयी घोडदौड सुरू ठेवली असून या निकालानंतर अक्कलकोट मधील माजी आमदार तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजप जिल्हाध्यक्ष तसा विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपली पहिली प्रतिकार दिली.
शेतकऱ्यांनी मतपेटीतून राग व्यक्त केला
शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकारबद्दल प्रचंड नाराजी होती.लोक वैतागले होते. चिडले होते.अनेक दिवसांपासून निवडणुका नव्हत्या. अक्षर:शा त्याचा राग या मतपेटीतून व्यक्त झालेला पाहायला मिळाला.विधानसभा निवडणुकीला यापेक्षाही जबर फटका विरोधकांना बसेल.याचे आत्मचिंतन विरोधकांनी करावे.पक्ष फोडीचे राजकारण विरोधकांना भोवले आहे आणि विरोधी पक्षाच्या लोकांच्या पाठीमागे ईडी सीबीआय सारख्या चौकशी यंत्रणांचा ससे मिरा लावून त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांना आपल्या पक्षांमध्ये खेचून ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला गेला परंतु जनतेने त्या गोष्टींना थारा दिलेला नाही.हुकूमशाही, अहंकार आणि
दबाव तंत्राचे राजकारण फार काळ चालणार नाही.आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने महाविकास आघाडी काम करेल आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही याबद्दल आता सध्या तरी कोणाच्या मनात शंका नाही.
सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री
जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.त्यांच्या माध्यमातून महायुतीने जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात केला पण दुर्दैवाने विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी विचार केला नाही याची खंत वाटते. निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर व्हाव्यात असे मला वाटते पण यामधील ज्या उणीव आहेत त्या उणिवा आम्ही निश्चितच दूर करू आणि या पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा नव्या जोमाने काम करू यश मिळवू.
सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष भाजप