क्राईममहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

नशेत झालेल्या भांडणात युवकाचा खून, दहिटणे शिवारातील घटना, जोडभावी पेठ पोलिसांकडून एकास अटक

सोलापूर : प्रतिनिधी

दारूच्या नशेत मागील भांडणाच्या रागातून दोघांनी युवराज प्रभुलिंग स्वामी (वय १९, रा. शिवगंगा नगर, शेळगी) याचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. ओळखीच्या दोघांनी युवराजला घराबाहेर बोलावून दुचाकीवर बसवून नेले होते. पोलिसांनी काही तासांतच दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले, पण त्यातील एकजण अल्पवयीन आहे. त्यामुळे पोलिसांनी विजय ऊर्फ सोनू बनसोडे याला रविवारी (ता.२९) अटक केली.

मृत युवराजचा मित्र विजय ऊर्फ सोनू बनसोडे व त्याच्या ओळखीचा एक अल्पवयीन मित्र, या दोघांनी शनिवारी (ता.२८) रात्री दहाच्या सुमारास युवराजला दुचाकीवर बसवून नेले. तिघेजण घरापासून काही अंतरावरील मित्रनगर, शेळगी परिसरातील निर्मल डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेत गेले.

त्याठिकाणी मद्यपान केले आणि थोड्या वेळाने मागील भांडणाच्या रागातून त्या दोघांनी युवराजसोबत वाद घालायला सुरवात केली. त्यानंतर त्या दोघांनी तेथील मोकळ्या जागेतील प्लॉट दर्शविण्यासाठी वापरलेल्या स्टिलच्या स्टॅण्डने कपाळावर, डोळ्यावर, तोंडावर जोरात युवराजला मारहाण केली. या जबर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवराजचा जागीच मृत्यू झाला. जोडभावी पेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलिस निरीक्षक शबनम शेख यांनी अंमलदारांसह घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धा वस्थेत युवराजला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलविले. पण, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यातील त्या दोन्ही संशयितांचा शोध सुरू केला आणि अवघ्या काही तासांत त्यांना पकडले. आज (सोमवारी) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

..अन् ‘त्याने’ युवराजला संपविले

रिक्षा चालविणारा १९ वर्षीय युवराज आपल्या कमाईतून कुटुंबाला हातभार लावत होता. पण, काही दिवसांपूर्वी मित्र विजय ऊर्फ सोनू याच्यासोबत किरकोळ कारणातून वाद झाला होता. तो बाद युवराज विसरूनही गेला होता, मात्र सोनूच्या मनात त्याचा राग कायम होता. त्याने विश्वासाने काही दिवसांनी म्हणजेच शनिवारी (ता. २८) युवराजला घरातून दुचाकीवर बसवून नेले आणि त्या भांडणाच्या रागातून त्याला कायमचेच संपविले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक शबनम शेख करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!