देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाखाली दुकानदारी चालवल्यामुळे सोलापूर, माढ्यात भाजपाला फटका

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी सर्व समाजघटकाला न्याय देत डॉ. आंबेडकरी महार समाज उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून भाजपा व संघ परिवार सामाजिक समरसतेचा हेतू साध्य करण्यासाठी डॉ. आंबेडकरी समाजाला झुकते माप देण्याचा हेतू आहे. मात्र सोलापूर भाजपाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी झुकते माप तर सोडाच पण भाजपातील डॉ. आंबेडकरी महार समाजाला जाणीवपूर्वक बाजूला केले.
सोलापूर लोकसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सोलापूर लोकसभेसाठी स्थानिक भाजपाच्या १९ कार्यकत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र या दलित उमेदवारांना बोलावून साध्या मुलाखतीसुद्धा घेतल्या नाहीत, साधे विचारलेही नाही. उमेदवारी मागणारे अभ्यासू व तगडे उमेदवार असताना त्यांना दुय्यम स्थान देण्यात आले, त्यांची हेटाळणी करत अपमान केला गेला. आम्ही राम सातपुते दगड दिला आहे, दगडाला निवडून द्या, प्रचार करा अशी भाषा नरेंद्र काळे यांनी निवडणुकीत दिलीप शिंदेंना वापरली, अपमान केला गेला. एकही सोलापूरचा दलित लायकीचा नसल्याने आपण बाहेर जिल्ह्यातून राम सातपुते सारख्याला उमेदवारी दिली अशी भाषा वापरली, हेटाळणी केली.
पक्षातीलच काही लोक काँग्रेसला मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याचा त्यांना राग होता. म्हणून त्यांनी मी जेंव्हा जेंव्हा निवडणुकीत जबाबदारी द्यावी म्हणून मागणी केली, त्या-त्या वेळी अनेकांना जबाबदारी दिली नाही. उगाच काही तरी सांगून माघारी पाठवले. अनेक जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विचारले नाही. त्यामुळे सोलापूरची जागा गेल्याची खंत आहे.
जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी जेंव्हा जेंव्हा यंत्रणा कमी पडते. चांगली लागत नाही. जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या म्हणून अनेकवेळा सांगण्याचा प्रयत्न केला, ते कधीच ऐकून घेतले नाही, वेळ दिला नाही, प्रचाराची यंत्रणा निट न हाताळल्यामुळेच भाजपाचे राम सातपुते यांचा पराभव झाल्याचे भाजपचे दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी गणेश कांबळे, गिरीष सरवदे, राजू भागवत, संजय बनसोडे, साईनाथ कोळी, सुरेश अंबुरे, करण गजधाने, प्रकाश रजपूत आदी प्रमुख कार्यकर्ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.