शिवराज्याभिषेक दिना निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा.

सोलापूर : प्रतिनिधी
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टच्या वतीने छत्रपतींच्या मुर्तीस धार्मिक विधिवत पद्धतीने दुग्धाभिषेक करत पुजन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार प्रणिती शिंदे, पालिका आयुक्त शितल तेली-उगले, उपायुक्त संदिप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. महामंडळ ट्रस्टच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, महामंडळ ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, महामंडळ ट्रस्टचे राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, सुनिल रसाळे, आबा भुईटे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, माऊली पवार, अंबादास शेळके, आबा सावंत, सुशील बंदपट्टे, विजय पुकाळे, यांच्यासह महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.