सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

नवनिर्वाचित ४८ खासदारांपैकी ३० खासदार मराठा समाजाचे, मराठा समाजाचे प्रश्न सुटणार का.? सर्वसामान्य मराठ्याचा सवाल.

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील नवनिर्वाचित ४८ खासदारां पैकी ३० खासदार हे मराठा समाजाचे, तर नऊ ओबीसी आहेत. अनुसूचित जातींचे सहा खासदार निवडून आले. अनुसूचित जातींचे सहा, तर अनुसूचित जमातींचे चार खासदार आहेत. वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव खासदार ठरल्या आहेत.

राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे. यावेळीही तेच चित्र दिसून येते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरला होता. मराठा समाजाच्या विजयी खासदारांमध्ये महाविकास आघाडीतर्फे ३० पैकी १८ जण निवडून आले. महायुतीतर्फे १२ मराठा उमेदवार जिंकले.

मराठा समाजाचे खासदार

१) स्मिता वाघ, २) शाहू छत्रपती ३) डॉ. शोभा बच्छाव ४) नारायण राणे ५) श्रीकांत शिंदे ६) उदयनराजे भोसले ७) नरेश म्हस्के ८) विशाल पाटील ९) सुप्रिया सुळे १०) मुरलीधर मोहोळ ११) श्रीरंग बारणे १२) धैर्यशील मोहिते १३) धैर्यशील माने १४) संजय देशमुख १५) अरविद सावंत १६) प्रतापराव जाधव १७) राजाभाऊ वाजे १८) नीलेश लंके १९) ओमप्रकाश राजेनिंबाळकर २०) डॉ. कल्याण काळे २१) संदीपान भुमरे २२) वसंत चव्हाण २३) नागेश आष्टीकर २४) संजय जाधव २५) बजरंग सोनवणे २६) अनुप धोत्रे २७) अमर काळे २८) प्रतिभा धानोरकर २९) रविंद्र वायकर ३०) अनिल देसाई हे आहेत.

जातीय समीकरणे नेहमीच निवडणुकीत निर्णायक ठरत आलेली आहेत. राज्यातील नवनिर्वाचित ४८ खासदारां पैकी ३० खासदार हे मराठा समाजाचे निवडून आले असून आगामी काळात सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे प्रश्न सुटणार का.? हा खरा सवाल मराठा समाज विचारत आहे. तीस खासदारांनी आपले पक्षीय राजकारण बाजूला ठेवत मराठा समाजासाठी एकजूट होऊन, मराठा आरक्षण यासह मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येत आपली एकजूट दाखवून समाजाचे प्रश्न सोडवावेत हीच अपेक्षा समाजा कडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!