अ.भा.उर्दू साहित्य समिती तर्फे शिक्षक दिना निमित्त उत्कृष्ठ मुख्याध्यापक, शिक्षक व आदर्श शाळा प्रस्कार जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीने शिक्षक दिना निमित्त उल्लेखनिय कार्य कैलेल्या शहर व जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक तसेच मुख्याध्यापकांचा उत्कृष्ठ मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार देऊन गुरुवार ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ६.३० वाजता कॉ बेरीया शैक्षणिक संकुल नवीन हॉल लष्कर येथे तैमूर मुलाणी, सह आयुक्त सोलापूर महानगर पालिका यांचे हस्ते, संजय जावीर, प्रशासन अधिकारी प्रा. शिक्षण मंडळ व डॉ.मा.अ.हाफीज जुनेदी यांचे प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. उर्दू भाषेतील विद्याध्यांना ज्ञानदान करताना त्यांनी घेतलेले परिश्रम, राबविलेले विविध उपक्रम तसेच शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तु, शाल व श्रीफल देऊन यथोचित गोरव करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी एकूण १४ जणांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असुन यामध्ये प्राथमिक शाळेतील ३ मुख्याध्यापक व ६ शिक्षक, माध्यमिक शाळेतील २ शिक्षक व १ मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक विभागातील १ व क्रिडा विभागातील १ अश्या शिक्षकाचा समावेश आहे. तसेच सोलापूर शहरातील सर्वोत्कृष्ठ माध्यमिक शाळा म्हणून दि सोलापूर सोशल हायस्कुल ला तर सर्वोत्कृष्ठ प्राथमिक शाळा म्हणून ए.पी.जे. अब्दुल कलाम शाळेला पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्रस्कार प्राप्त करणारे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक
१ इरफान अ.रशीद जानयाडकर
२ गझालापरवीन म. महियुव सौदागर
३ फहमिदा अशफाक अहमद मंदगी
४ जहाआरा मैनोंदिन तांबोळो
५ मोहम्मद इस्माईल यशीर अहमद डोणगांवकर
६ कुर्रतुल आईन बशीर शेख
७ सोहेल फकीर अहमद शेख
८ नफीसाबेगम जाकीरहुसेन शेख
९ मुदस्सरपाशा आरीफपाशा पिरजादे
१० नाझीषा सलीम शेख
११ महमुब अहमद जावीदअख्तर अन्सारी
१२ निशातभारा अहमद पटेल
१३ परवीन शोकत शेख
१४ सईदाबेगम म.हारुण दारुवाले
आदर्श शाळा पुरस्कार
१ सोलापूर सोशल असो उर्दू हायस्कूल, सोलापूर.
२ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम उर्दू प्रा.शाळ, सोलापूर.
या पत्रकार परिषदेस यू एंड बेरिया, रफिक खान, नासिन आळंदीकर, अशपाक सातखेड, रियाज वळसंगकर आदी उपस्थित होते.