श्री श्री श्री बसवारूढ मठाच्या गोशाळेचे भूमिपूजन
राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी
श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाच्या गोशाळेचे भूमिपूजन राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.
विमानतळापाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टच्या प्रांगणात भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, किरण जोशी, महेश भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टच्यावतीने सध्या काही देशी गाईंची देखभाल करण्यात येत आहे. लवकरच या ठिकाणी गोशाळा बांधण्यात येणार असून या गोशाळेत मोठ्या प्रमाणावर गाईंचा सांभाळ करण्यात येणार आहे.
मानवी आरोग्य राहते सुदृढ
गाईची सेवा करणे हे महापुण्य असल्याचे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. गोपालन आणि गोसंवर्धनामुळे मानवी आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे समाजाच्या निरोगी आयुष्यासाठी श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टच्यावतीने भव्य गोशाळा लवकरच अस्तित्वात येणार आहे.
– श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, मठाधिपती, श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ