रेल्वे इंजिन आणि डबा रेल्वे रुळावरून घसरला, कोणतीही जीवितहानी नाही, ३ तास वाहतूक खोळंबली, प्रवासी हैराण

सोलापूर : प्रतिनिधी
होडगी येथील पूर्वीची बिर्ला सिमेंट कंपनी आता सध्या अल्ट्राटेक सिमेंट नावाने सुरू आहे. तेथे रेल्वेच्या माध्यमातून सिमेंटची मालवाहतूक केली जाते. यावेळी औंज ते सोलापूर रस्त्यावर होडगी वरून येताना गेट पडतो, म्हणजे रस्ता बंद करून रेल्वे जाते त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात येते.
परंतु आज अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची माल वाहतूक करणारी रेल्वे इंजिन आणि एक डबा रुळावरून खाली घसरला. त्यामुळे औंज ते सोलापूर रस्त्यावरील रेल्वेचे गेट बंद असून मागील तीन तासापासून हे गेट बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची मालवाहतूक करणारी रेल्वे इंजिन आणि डबा रुळावरून घसरला परंतु कोणतीही जीवित हानी झाले नाही. याचे काम पूर्ण होण्यास आणखी वेळ लागत असल्याने येथे नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ भतगुनकी आणि स्थानिक नागरिकांनी दिली.