पवार साहेबांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना, पवार साहेबांच्या गुगलीत कुणाची विकेट पडणार यावरून चर्चेला उधान

सोलापूर : प्रतिनिधी
बारामती गोविंद बाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वोसर्वे शरदचंद्र पवार यांची सोलापूर राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी भेट घेतली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल शरद पवार यांना देऊन सर्व माहिती दिली.
सोलापूर शहरात येणारे शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण हे तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशा पद्धतीने लढत देऊ शकते. या तिन्ही मतदार संघातील सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे.
यासह अनेक विषयांवर शरद पवार यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव यांच्या समावेत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूरातील कार्यकर्ते अजित बनसोडे, शिवानंद भणगे, शिवलाल जाधव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.