Big Breaking.. ‘सगेसोयरे’ प्रश्नी मनोज जरांगेचा सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम्, उपोषण तात्पुरते स्थगित
दिलेला शब्द पाळणार : शंभुराज देसाई

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी सगेसाेयरीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत या प्रश्नी १३ जुलैपर्यंत राज्य सरकारने ठाेस निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे सरकारचे ऐकणार नाही. सरकारने एक महिन्यात निर्णय न घेतल्यास निवडणुकीत उतरणार, यावेळी नाव घेवून उमेदवार पाडू, असा इशारा आज मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना दिला. तसेच त्यांनी १३ जुलैपर्यंत आपले बेमुदत उपाेषणही स्थगित केले आहे.
दिलेला शब्द पाळणार : शंभुराज देसाई
मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपाेषणाचा आज सहावा दिवस आहे. आज अंतरावली सराटीमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली. मंत्री शंभुराज देसाई जरांगे-पाटील यांच्याशी बोलत असताना म्हणाले, “दिलेला शब्द पाळणार. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीला आमचा विरोध नाही. पण सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीला घाई नको. उद्या १४ जून उपमुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहोत. तुमचाही एक प्रतिनीधी पाठवा. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्हाला दोन महिन्यांचा कालावधी द्या. आचारसंहितेत वेळ गेल्यामुळे थोडं सहकार्य करा.
तर राजकारणात उतरणार
मंत्री शंभुराज देसाई यांच्या संवादानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, एक महिन्यात जर निर्णय झाला नाही तर निवडणुकीत उतरणार “आणि कोणीही मराठ्यांच्या दारात यायच नाही. १३ जुलैपर्यंत त्यांनी सरकारला अल्टीमेट दिला आहे.