सुनेत्रा वहिनी राज्यसभेवर बिनविरोध खासदार, सोलापुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राज्यसभेवर एकमताने सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी दिली. काल त्यांनी उमेदवारी दाखल केली सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नसल्यानं त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सुनेत्रा अजित पवार यांच्या निवडीचा सोलापूर राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात आला.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रेरणास्थान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत एकच धुन बारामतीची सून, सुनेत्रावहिनी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, विकासाचा वादा अजित दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सर्व पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करीत एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष साजरा केला.
येणाऱ्या काळात सुनेत्रा वहिनी ह्या बारामती नव्हे संपूर्ण राज्याचा विकासासाठी लाभदायक ठरतील असा मला ठाम विश्वास आहे. सुनेत्रा वहिनी अजित दादांच्या सुविधा पत्नी असल्याने विकासाचा वादा अजित दादा या प्रयोगाप्रमाणे वहिनी राज्याचा विकास साधतील अशी आम्हाला खात्री आहे. असा विश्वास जल्लोषावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार हे विकास पर्व नेतृत्व आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सुनेत्रा वहिनी देखिल राज्याचा विकास साधतील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. सुनेत्रा वहिनींची राज्यसभेवर खासदार पदी निवड झाल्याबद्दल आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी दिवाळी साजरी केली अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली.
या प्रसंगी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, श्रीनिवास कोंडी, बिज्जु प्रधाने, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रकाश जाधव, अमीर शेख, खलील शेख, चेतन गायकवाड, मारुती तोडकरी, सुरेश तोडकरी, मदन क्षीरसागर, वैभव गंगणे, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कस्पटे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, ज्योती शटगार, प्रिया पवार, कांचन पवार, शोभा गायकवाड, सुरेखा घाडगे, रुक्मिणी जाधव, संगीता गायकवाड, भाग्यश्री राठोड आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.