दिलावर मनियार यांच्या पुढाकाराने, पालिकेच्या नूतन आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांचा करण्यात आला सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आरोग्य अधिकारी म्हणून डॉ राखी माने यांची नियुक्ती झाल्या नंतर त्यांनी आपल्या पदाचा पदभार घेतला. कामाला सुरुवात केली परंतु त्यांच्या समोर शहराच्या आरोग्य विभागातील अनेक आव्हाने उभी आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोलापूर महानगर पालिकेचे असणारे सर्व दवाखान्यांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. तेथे येणाऱ्या सोलापूरकरांना पुनश्च एकदा हॉस्पिटलला यावे असे वाटावे अशी स्वच्छता शहरवासीयांकडून अपेक्षित आहे. हॉस्पिटल मधील काही कर्मचारी दवाखान्यात येणाऱ्यांना उद्धटपणे बोलतात त्यांच्या बोलण्यात सुधारणा व्हावी. दवाखान्यातील डॉक्टरांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यातून मार्ग काढावा. अत्याधुनिक मशनरी शासनाकडून उपलब्ध करून घेणे, जास्तीत जास्त निधी आरोग्य विभागाला मिळवून त्याचा सदुपयोग करणे हे सोलापूर शहरवासीयांना अपेक्षित आहे. आरोग्य विभागावर येणारे कोणतेही संकट आपण तत्परतेने हाताळून त्यातून मार्ग काढत सर्वांना न्याय द्यावा. डॉ राखी माने यांच्या नियुक्ती नंतर अनेकांनी त्यांचे स्वागत करत सत्कार केला.
सोलापुर महानगरपालिकेचे नुतन आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांचा सत्कार मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलावर मनियार, एस एफ डब्ल्यु सुभाष सुरवसे, सादिक शेख, अरविंद गजधाने, परमेश्वर कसबे, सुशिल सुरवसे, नितीन तळभडारे, अख्तर हुसेन शेख, युवराज बनसोडे, दत्ता शिंगे आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.