शहरात बकरी ईद उत्साहात, देशात सुख समृद्धी शांतता नांदावी यासाठी केली प्रार्थना
बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर आणि परिसरात आज बकरी ईद उत्साहात साजरी केली गेली. ईदनिमित्त शहरातील सर्वच ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठण केले. आज सकाळी ८:३० च्या सुमारास होटगी रोडवरील ईदगाह मैदानात मुफ्ती सय्यद अमजद काझी यांनी नमाजपठण केले. इस्लामी काल गणनेनुसार जिल्हज या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणा-या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात.
अल्लाहचे प्रेषित हजरत इब्राहिम, त्यांची पत्नी हाजरा यांची अल्लाहच्या प्रती भक्ती, बलिदान, त्याग आणि विश्वास यांची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. इस्लामी कालगणनेनुसार जिल्हज या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणा-या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात. लोकांनी नमाज अदा करून देशात सुख-समृद्धीसोबतच शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.
बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व
बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे. या कुर्बानीनंतर जे मांस मिळतं त्याचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वतःसाठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी दान करण्यात येतो. कुर्बानी तीन भागांत व्यवस्थित वाटल्यानंतरच वैध मानली जाते.