जवाहर जाजू यांनी रुग्णसेवेसाठी 24 तास तत्पर रहात मंगेश चिवटेना दिल्या अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा.
अंध शाळेत मुलांना खाऊ वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधी चे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसा निमित्त दमाणी अंध शाळा येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला.
सोलापूर वैद्यकीय कक्षाचे समन्वयक जवाहर जाजु यांनी उपस्थितांचे स्वागत केले मंगेश चिवटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोलापूर वैद्यकीय कक्षाचे समन्वयक जवाहर जाजू यांनी आपल्या पदाचा पदभार घेतल्यापासून स्वतःला वैद्यकीय क्षेत्रात वाहून घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्यासह सोलापूर शहरातील महानगरपालिका, खाजगी, ट्रस्ट यासह सर्व दवाखान्यांमध्ये कोणत्याही रुग्णांना कोणत्याही प्रकारची मदत लागली तर जवाहर जाजू हे हजर असतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून रुग्णांना भरगोच निधी मिळवून देण्यात जवाहर जाजू यांनी आघाडी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत. मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने सोलापूर शहर जिल्ह्यातील रुग्णांना नेहमी मदत होते अशी भावना जवाहर जाजू यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी मुख्याध्यापक दर्शनाळे सर, भाजप शहर चिटणीस शेखर फंड, भाजपा शहर कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया, माहेश्वरी समाजाचे उपाध्यक्ष गिरीष जखोटिया, माहेश्वरी समाजाचे सचिव किरणकुमार राठी, ज्ञानेश्वर शिंदे, यादव मॅडम उपस्थित होते.