उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सोलापुरातील मुस्लिमांनी मानले आभार, वख बोर्डला नव्याने १०० कोटी देण्याची केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
राज्य सरकार कडून वख बोर्ड ला दहा कोटी रुपयांची निधी मंजूर केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद वक मंडळा ला दोन कोटी निधी विस्तारित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापूर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच वख मंडळाला वाढीव 100 कोटी रुपयाची मागणी देखील लवकरच शिष्टमंडळ भेटून करणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून जल्लोषास् सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, इरफान शेख, रियाज शेख, बब्बू पैलवान अड्डेवाले, शाबाज किंग, आयाज नदाफ, जुने दर्जी, रौफ शेख, गौस शेख, दौला मिस्त्री, इर्शाद कुरेशी, गुज्जर शेख, यांच्या सह बहुसंख्य मुस्लिम बंधू उपस्थित होते.
तसेच दादांनी निधी मंजूर केल्याबद्दल एकामेकांना पेढे भरून, वाटून आनंद उत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमचे आयोजक इरफान शेख व अल्पसंख्यांक विभाग कार्याध्यक्ष रियाज शेख मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.