विजयाची हवा डोक्यात गेल्याने प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यातून बालिशपणा अहंकार मग्रुरी दिसते : नरेंद्र काळे

सोलापूर : प्रतिनिधी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी तोंडाने इशारा करत चंपा असा केला. दुसरीकडे दक्षिण सोलापुरातील एका कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांसमोर भाषण करताना ‘आता त्रास सहन करायचा नाही, तर त्रास देण्याची वेळ आली’, असे विधान केले.
अशा विधानांमुळे त्यांच्या डोक्यात खासदारकीची हवा शिरल्याने त्या अहंकारी, मयूर बनल्या आहेत, त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अवैध धंदे सुरू करण्याची मागणी आणि निवडणूक निकालानंतरची त्यांची सततची वक्तव्ये यातून काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका भाजपने केली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य अतिशय बालिशपणाचे आहे. त्यांची किव करावीशी वाटते. निवडणुकीतील विजयाच्या अहंकारात त्यांनी आपली संस्कृती विसरू नये. कृतज्ञता मेळावे, गावभेट दौऱ्यातील त्यांच्या वक्तव्यातून अहंकार, मग्रुरी दिसून येत आहे. त्यांची सततची वक्तव्ये आणि त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यां कडून होणारी अवैध धंदे सुरू करण्याची मागणी यातून काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे. अशी टिका भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली.