“नीट” घोटाळ्यात सोलापुरातील शिक्षक, कोण हा जाधव.? कारवाईची कोणी केली मागणी.? वाचा..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील प्राथ. शाळा शिक्षक संजय जाधव यांचा देशभर गाजत असलेल्या “नीट” घोटाळ्यात सहभाग दिसून आला आहे. वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात बदली होऊन आलेले संजय जाधव हे प्राथ. शिक्षक वारंवार गैरहजर राहणे, आपल्या ठिकाणी पर्यायी खाजगी शिक्षक नेमणे या बाबी त्यांच्याकडून वारंवार झाल्याचे ग्रामस्थां कडून सांगण्यात आले. या अनुषंगाने पुनशः शिक्षण विभागातील अंगचोरी उघडकीस आलेली असून सर्वसामान्य शेतकरी शेतमजुर यांच्या मुलांच्या भविष्या सोबत छेडछाड करणे हे योग्य नाही. या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
१) शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी नेमके काय करतात ?
२) नेमणूकीच्या ठिकाणी शिक्षक राहतात का ?
३) नेमणूक असलेलेच शिक्षक वर्गावरती असतात का ?
४) प्राथ. व माध्य. विभागात खाजगी शिक्षक नेमून दांड्या मारणारे शिक्षक उर्वरीत वेळेत काय करतात ?
५) दोन्ही विभागातील कार्यरत असलेल्या कार्यक्षेत्रात खाजगी शिकवणी घेतात का ? असतील तर कोणत्या अधिकारात ?
६) सोयीच्या नेमणूकीकरीता जोडलेली कागदपत्रे (उदा. मेडीकल सर्टिफीकेट, आंतर दाखले, कौटुंबिक कारणे) याची उलटतपासणी व्हावी. सर्रासपणे खोट्या कागदपत्रांचा वापर करून बदली करून घेणे हे प्रकार दिसून येतात.
७) हजेरी पुस्तक, दप्तर तपासणी, विद्यार्थ्यांची / ग्रामस्थांची प्रतिक्रीया इ. बाबींची तपासणी व्हावी.
तरी आपण तात्काळ जिल्ह्यातील प्राथ. व माध्य. शाळांची तपासणी करावी. संजय जाधव यांच्या सारखे प्रकार निदर्शनास आल्यास अन् त्यामध्ये जे-जे दोषी असतील त्यांचेवर कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन महादेव जगताप यांनी निवेदना द्वारे दिला.