आप्पा उर्फ खंडू बन्ने खुनातील 4 आरोपी अटक, न्यायालयाने सुनावली 3 दिवसाची पोलीस कोठडी

सोलापूर : प्रतिनिधी
21 जून 2024 रोजी दुपारी 12.30 वा. चे सुमारास मौजे बाळे ता. उत्तर सोलापूर येथील गट नं.41/3 या शेता मध्ये शासकिय मोजणी करीत असताना शांतप्पा आडके, सागर आडके, बाळु आडके यांनी त्याचा राग मनात धरुन ही शेती आमची आहे, मोजणी करायची नाही, नाहीतर एकेकाला सोडणार नाही, या हरामखोरांना संपवु असे म्हणुन शांतप्पा आडके, सागर शांतप्पा आडके, बाळु आडके सर्व राहणार देगांव, ता. उत्तर सोलापूर व त्यांचे सोबतचे अनोळखी इतर 7 ते 8 इसम असे सर्वांनी एकत्रीत येवुन त्यांचे हातातील लोखंडी कोयता, लोखंडी पाईपने भाऊ पुरुषोत्तम याचे डोकिस, दोन्ही हाता-पायावर, कमरेवर, शरीरावर वार करुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मला लोखंडी पाईपने उजव्या खांद्यावर तसेच डाव्या पायाचे पिंडरीवर मारहाण करुन जखमी केले म्हणुन माझी शांतप्पा आडके, सागर आडके, बाळु आडके सर्व राहणार देगांव, ता. उत्तर सोलापूर व त्यांचे सोबतचे अनोळखी इतर 7 ते 8 इसम यांचे विरुध्द तक्रार दिली आहे.
यात उत्तर कसबा येथील पुरुषोत्तम दिगंबर बन्ने याचा खून केल्याप्रकरणी शांतप्पा यशवंत आडके, सागर शांतप्पा आडके, विजयकुमार ऊर्फ बाळू शांतप्पा आडके व महादेव सदाशिव धबाले, सर्व रा.सोलापूर यांना पोलिसांनी अटक केली. आज रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यात आरोपीतफे अँड. संतोष न्हावकर, अँड. शहानवाज शेख, अँड. राहुल रूपनर, अँड. शैलेश पोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. अमर डोके हे कामपाहत आहेत.