सोलापुरातील व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले संतोषभाऊ, अजितदादा कडे GST लेखापरीक्षण सोलापुरात करण्याची केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी (मुंबई)
सोलापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे GST लेखापरीक्षण परिक्षेत्र कोल्हापूर येथून नियंत्रित करावे परंतू GST लेखापरीक्षण सोलापुर कार्यालयातूनच व्हावे येथेच आधिकारी आणि कर्मचारीवर्ग यांची नेमणूक करावी जेने करून सोलापूरातील व्यावसायिकांवर कोल्हापूरला जाऊन हेलपाटे मारावे लागणार नाहीत त्यांचे लेखापरीक्षण येथेच होईल अशी मागणी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी राष्ट्रवादी भवन मुंबई येथील कार्यालयात आदरणीय अजित पवार यांच्या कडे निवेदनातून केली.
मा. राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दिनांक २१ मे २०२४ रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये राज्य वस्तु व सेवाकर विभागाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. सदर पुनर्रचनेनुसार GST व्यापाऱ्यांचे लेखापरिक्षण (Audit) करण्याकरिता नवीन विभाग तयार करण्यात आलेला आहे व त्यासाठी परिक्षेत्रनिहाय कार्यालयात एकूण ५० अधिकारी व १३३ कर्मचारी असे एकूण १८३ अधिकारी- कर्मचा- यांची पदे निर्माण केलेली आहे.
राज्यकर आयुक्तांच्या दि. २१ मे २०२४ रोजीच्या आदेशामुळे दि. १५ जुलै २०२४ पासून कोल्हापूर सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या ६ जिल्हयातील व्यापाऱ्यांचे लेखापरिक्षण हे कोल्हापूर कार्यालयातून होणार आहे. काही वरीष्ठ अधिकारी छोट्या शहरात काम करण्यास निरूत्साही असल्याने त्यांच्या सोयी साठी व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासांचा विचार न करता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्टामध्ये GST व्यापाऱ्यांचे लेखापरिक्षण हे फक्त मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व नागपूर या कार्यालयातच होणार आहे. त्यामुळे इतर ठिकाणांवर अन्याय होणार आहे.
सोलापूर जिल्हामधील साखर कारखाने, यंत्रमाग उदयोग, कापड उदयोग, रासयनिक उदयोग, पर्यटन उदयोग व इतर लहान मोठ करदाते असे एकूण १० ते १२ हजार करदाते आहेत यांच्याकडून वस्तु व सेवा कराच्या माध्यमातून २०२३-२४ या अर्थिक वर्षामध्ये एकूण रूपये १०६३.७५ कोटी शासकीय महसूल जमा केलेला आहे तरीसुध्दा सदरील पुनर्रचनेमुळे सोलापूर कार्यालयातून एकूण ६० अधिकारी – कर्मचारी कमी होवून त्यांना परिक्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर येथे वर्ग करणार आहेत.
सोलापूर जिल्हयातील व्यापाऱ्यांना होणार त्रास, कर्मचाऱ्यांनी कमी होणारी पदे आणि शासकीय महसूलाचा होणारा अपव्यय विचारात घेता, सदर नवीन निर्माण झालेल्या लेखापरिक्षण (Audit) विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांची पदे सोलापूर कार्यालयात निर्माण करून त्यांनी व्यापाऱ्याच्या लेखापरिक्षण (Audit) चे काम केले तर व्यापाऱ्यांना सोयीस्कर ठरणार असून शासनाच्या पैशाचाही बचत होईल अशा आशयाचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित पवार यांना देण्यात आले या विषयावर आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने यांनी देखील लक्ष घातले असून ते देखील यासाठी पाठपुरावा करीत असल्याबद्दल उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सांगत लवकरच शिक्षक विधान परिषदेची निवडणूक आचार संहीता संपताच GST कमिशनर यांच्याशी चर्चा करून यांवर योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.