सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीचे ०५ गुन्हे उघडकीस, शहर गुन्हे शाखेची उत्तम कामगिरी

सोलापूर : प्रतिनिधी
शहर गुन्हे शाखेचे पो.उप.नि./अल्फाज शेख यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे, आरोपी नामे सिध्दू शामराव काळे, वय ३१ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मु.पो. चिंचोली एम.आय.डी.सी., ता. मोहोळ, जि. सोलापूर, सध्या रा. मुळेगांव, ता. दक्षिण सोलापूर यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची झडती घेतली असता, त्याचे पॅन्टच्या खिशात एक सोन्याची अंगठी व त्याचे ताब्यातील पिशवीमध्ये, एक लोखंडी छन्नी व हातोडी मिळून आली. त्याबाबत त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता, त्याने, मागील ०८ दिवसापूर्वी जवाहर नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर येथे रात्रीच्या वेळी घरातुन चोरी केली असुन, त्यातीलच ती, सोन्याची अंगठी असल्याचे सांगुन, गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर बाबत एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं. ३७०/२०२४ भा.दं. वि. कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले आहे. त्यानंतर, आरोपी नामे- सिध्दू शामराव काळे यास नमूद गुन्ह्यामध्ये अटक करणेत आली.
सदर आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान, कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्याने सोलापूर शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, सोलापूर शहर हद्दीतील अशाच प्रकारचे खालील नमुद गुन्हे केल्याची कबुली दिली. नमूद आरोपी कडून, खालील एकुण ०५ गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल- ८८.८४० ग्रॅम सोन्याचे दागिने, ४८८.१०० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम ५५,००० रुपये असा एकूण ३,७६,३१०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. सदर आरोपीकडून पाच गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसिम शेख, अंकुश भोसले, शैलेश बुगड, अभिजित धायगुडे, धिरज सातपुते, चालक पोलीस अंमलदार बाळासाहेब काळे, अनिकेत खत्री, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, ज्योती लंगोटे, अर्चना स्वामी, निलोफर तांबोळी, सायबर पोलीस ठाणेचे मच्छिद्र राठोड, प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.