रेल्वे लोको पायलटच्या घरी बायको मेहुण्याने केली चोरी, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल : ॲड गोविंदा नारवानी

सोलापूर : प्रतिनिधी
इंडियन रेल्वेचे लोको पायलट डेविड मार्टिन (रा. सोनी सिटी अपार्टमेंट, सोलापूर) यांनी स्वतःच्या पत्नी व मेव्हण्याच्या विरुद्ध सोलापूर न्यायालयात चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. घरातील दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याने सोलापूरच्या न्यायालयात जाऊन कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ खाली गुन्हा नोंद करण्याकरिता वकील नेमून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मेहरबान कोर्टाने अॅड. गोविंदा नारवानी यांचे युक्तिवाद ऐकून त्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश पारित केले.
त्यानुसार दिपक कुमार (मेहुणा), वीरजू कुमार (मेहुणा), कोमल कुमारी (बायको), सर्वजण रा. वासुदेव पूर, मुंगेर यांच्याविरूद्ध फौजदार चावडी येथे झालेले न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हा क्र. ३९२/२०२४ दाखल झाला आहे.
खऱ्या अर्थाने चोरीचा घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते परंतु पोलिसांनी हा गुन्हा का दाखल करून घेतला नाही.? तक्रारदाराला न्यायालयात का धाव घ्यावी लागली.? पोलिसांनी गुन्हा दाखल करून तक्रारदाराला न्याय दिला असता तर ही वेळ आली असती का.? यासह अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. परंतु ॲड गोविंदा नारवानी यांनी आपले चातुर्य वापरून घटनेतील गांभीर्य पुराव्यासह आपल्या युक्तिवादात मांडून चोरी कशाप्रकारे आणि कोणी केली हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले अखेर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले.