ॲड. शकील नाईकवाडी हल्ल्यातील आरोपींच्या बाजूने वकीलपत्र दाखल, ॲड रविराज सरवदे यांनी बार असोसिएशन विरोधात भूमिका का घेतली.?

सोलापूर : प्रतिनिधी
ॲड. शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला झाल्याने बार असोसिएशनच्या हॉलमध्ये सर्वसाधारण काल 28 जून रोजी सभा घेण्यात आली. त्यावेळी ॲड. शकील नाईकवाडी यांना झालेल्या मारहाणीमुळे दाखल गुन्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही वकिलांनी त्या आरोपींचे वकीलपत्र न घेणे. असे ठरावात सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते.
परंतु सोलापुरातील युवा वकील ॲड रविराज सरवदे, ॲड कपिलकुमार चलवादी यांनी वकीलपत्र दाखल करत कोर्टात आरोपींच्या बाजूने युक्तिवादही केला. सोलापूर बार असोसिएशन च्या सभेत ठराव झालेला असताना आरोपींचे वकील पत्र का घेतले.? ॲड रविराज सरवदे, ॲड कपिलकुमार चालवदी यांनी ही भूमिका का घेतली.? बार असोसिएशन ने केलेल्या ठरावाचं पुढे काय होणार.? असे सर्व प्रश्न समोर येतात आता पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
ॲड शकील नाईकवाडी यांच्यावर झालेल्या हल्यात आज आरोपीना 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली यात हकीकत अशी आहे कि, यातील फिर्यादी हे वकील असून त्यांच्यावर आरोपींनी हल्ला केलेला होता त्यामुळे त्यांनी फिर्याद दाखल केलेली होती व यातील आरोपी विरोधात भादंवि 307 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.
त्यानुसार यातील तपास अधिकारी यांनी या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक करून आजरोजी कोर्टासमोर उभे केले होते व पोलिसांनी 8 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती यामध्ये आरोपींच्या वकिलांनी त्या पोलीस कोठडीस तीव्र विरोध दर्शविला मे कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना 2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड जयसिंह चेळेकर तर आरोपींच्या वतीने ॲड रविराज सरवदे, ॲड कपिलकुमार चलवादी यांनी काम पाहिले.