सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्नी समवेत खेळली फुगडी, हरिनामाच्या नामात दंगलेल्या अधिकाऱ्यातील पांडुरंग भक्ताचे झाले दर्शन

सोलापूर : प्रतिनिधी (छत्रपती संभाजीनगर)
आषाढी एकादशीनिमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. पहिला मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमी आपेगाव येथे पालखीचे प्रस्थान आज झाले त्यावेळी छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व त्यांच्या सहभागी पत्नी करुणा स्वामी या दोघांनीही वारकरी वेश्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वारीमध्ये सहभाग घेतला.
गळ्यात टाळ घेऊन टाळ वाजवले, हरिनामा दंग झाले अखेर वारकऱ्यांच्या आग्रहा खातर त्यांनी मनसोक्त फुगडी खेळत पांडुरंगा विषयी असणारी आपली भावना भक्ती सर्वांसमोर दाखवून दिली.