सरकारचे महाराष्ट्रातील भगिनीच्या वतीने आभार, कोणी आणि का मानले आभार.?

सोलापूर : प्रतिनिधी
जनतेच्या भौतिक प्रगतीची अध्यात्माशी सांगड घालत आणि सर्व समाजघटकांच्या अपेक्षांची पूर्तता करत यंदाचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून २१ ते ६० वयोगटातील महिलांना शासनातर्फे दीड हजार रूपये प्रदान करण्यात येतील. तब्बल ४६ हजार कोटी रूपयांचा निधी या योजनेद्वारे महिलांचे भविष्य सुखकर करण्यासाठी वापरण्यात येईल. ह्या योजनेसह संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी साह्यभूत ठरणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षणासारखी महत्त्वाची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलीय.
पिंक ई रिक्षा योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातल्या १७ शहरांतल्या १० हजार महिलांना ८० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामूहिक विवाह योजनेतील सहभागी मुलींना मिळणाऱ्या अनुदानात १५ हजारांनी घसघशीत वाढ करत ते २५ हजार रूपयांवर नेण्यात आलंय.
देशपातळीवर महिलांच्या आयुष्यात भक्कम आर्थिक आधाराची पहाट आणणारी केंद्राची लखपती दीदी योजना महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी महिला बचत गटांची संख्या ६ लाख ४८ हजारांवरून ७ लाखांवर नेण्यात येईल. तसेच, बचतगटांच्या फिरत्या निधीत १५ हजारांवरून दुप्पट वाढ करत ती ३० हजार करण्यात आली आहे. महिला लघुउद्योजकांनाही स्टार्ट अप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता या वर्षीपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच, ‘आई’ योजनेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांनी १५ लाखांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून होईल. त्यातून १० हजार रोजगार निर्माण होतील.
अशा भरभक्कम तरतुदींच्या माध्यमातून महायुती सरकारने महिला कल्याणाचा आपला संकल्प निभावण्यासाठी दमदार पावलं टाकल्याचा पुरावा म्हणजे सादर झालेला अर्थसंकल्प असे म्हणत भाजपा प्रदेश महिला सचिव वैशाली गुंड यांनी महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींच्या वतीने महाराष्ट्रातील सरकार आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.