उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना धनगर समाजाचे निवेदन, अन्यथा आषाढी एकादशीला रात्री दोन वाजता शेळ्या मेंढ्यांसह प्रदक्षिणा घालणार..

सोलापूर : प्रतिनिधी
धनगर समाज व एन्टी प्रवर्गातील अ ब क ड, या सर्व तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर, तीस लाख बिनव्याजी कर्ज मिळावे याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तशा प्रकारचे आदेश सर्व बँकांना द्यावेत. पंढरपूर येथे अहिल्या भवन साठी जागा उपलब्ध करून पाच कोटी निधी द्यावा.
या प्रमुख मागण्यासाठी विधानभवनातील उपमुख्यमंत्री यांचे कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. यावेळी माऊली हळणवर, नवनाथ पडळकर, अमोल कारंडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यतिराज होनमाने यांच्या सह धनगर समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
वरील मागण्या मान्य न झाल्यास पंढरपूर येथे आषाढी एकादशीला पहाटे दोन वाजता विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्या सहित धनगर समाज बांधव प्रदक्षणा घालणार आहेत. होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी सरकारवर असेल असा इशारा धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदना वेळ दिला.