आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मन की बात कार्यक्रम..

सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा कार्यक्रम घेत असतात भारत देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या, विविध कलाकुशल, सामाजिक व देश हितासाठी अग्रेसर असणाऱ्या कार्याचा उल्लेख या मन की बात या कार्यक्रमातून मोदीनी संपूर्ण भारत देशासमोर मांडतात.
सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मन की बात हा कार्यक्रम महिलांच्या बहुसंख्येने संपन्न झाला. शहर उत्तर मध्ये विविध बूथ स्तरावरती हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने घेतला जातो. त्या पद्धतीनेच यावेळी देखील मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात हा कार्यक्रम झाल्याचे पाहण्यास आले.
या कार्यक्रमास महिला अध्यक्ष विजयाताई वड्डेपल्ली, माजी नगरसेविका, माजी नगरसेवक संजय कोळी, विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील, बाबुराव जमादार यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व महिलांनी मोठी गर्दी केली होती.