सोलापूरक्रिडादेश - विदेशमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक
क्रिकेट विश्वचषक जिंकला, सोलापुरात जल्लोष, पंतप्रधान मोदी कडून टिमचे अभिनंदन

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाने टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे.
फटाके फोडले जात आहेत, घोषणा दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले असून देशातील 140 कोटी देशवासीयांना आज अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे.
विश्वचषक जिंकण्याचा संबंध देशभर जल्लोष आनंद पहावयास मिळाला. सोलापुरात देखील रात्री अनेक युवक घराबाहेर पडून जल्लोष करत होते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सात रस्ता, आसरा, विजापूर रोड येथील ITI चौक, बाळे यासह विविध चौकात युवकांनी एकत्र येत घोषणा देत फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला.