पावणेचार लाख महिलांना मिळणार ५३२ कोटींचे कर्ज, २४-२५ वर्षातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट : मनिषा आव्हाळे

सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील ३५ हजार ३०१ बचत गटांतील तीन लाख ७० हजार महिलांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळ (मआविम) व ‘उमेद’तर्फे ५३२ कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देऊन व सक्षम बनविण्याचा प्रयत्न ‘मआविम’ व उमेदतर्फे केले जात आहे.
बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्याने गावागावांतील छोटी-मोठी बेकायदा सावकारी संपुष्टात आल्याची स्थिती आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील तब्बल पावणेचार लाख महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडला आहे.
गावागावातील गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडून त्यांना सक्षम बनविण्याचे नियोजन केले आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू, पदार्थांसाठी एक मार्केटिंगचे व्यासपीठ तयार करून देण्याचेही नियोजन केले आहे.
– मनीषा आव्हाळे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)