दुर्मिळ जीव वाचवणारी मेंदूची बायपास शस्त्रक्रिया यशस्वी, सोलापूरच्या न्यूरोसर्जनला यश

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरच्या एका न्यूरोसर्जनने 40 वर्षीय रुग्णावर दुर्मिळ जीव वाचवणारी मेंदूची बायपास शस्त्रक्रिया केली आहे. ज्यांना वारंवार मेंदूचे झटके येत होते. मेंदूच्या दुर्मिळ शस्त्रक्रियेद्वारे जीव वाचवण्यात न्यूरोसर्जन डॉ सचिन बलदवा यांना यश आले. त्यांच्या रुग्णाच्या कॅरोटीड धमनीची टर्मिनल शाखा ब्लॉक झाली होती आणि त्यामुळे वारंवार मेंदूचे झटके येत होते.
“दीर्घकालीन मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली जाते. स्ट्रोकचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये रक्ताभिसरण योग्य नसते आणि मेंदूच्या ज्या भागात हायपो-परफ्यूज आहे त्या भागात रक्ताभिसरण आवश्यक असते,” अशी माहिती न्यूरोसर्जन डॉ सचिन बलदावा यांनी दिली.
सहकारी न्यूरोसर्जन समीर फुटाणे आणि भूलतज्ज्ञ प्रकाश मोकाशी यांच्या सह सहा महिने शस्त्रक्रियेची तयारी केली कारण सोलापुरात अशी शस्त्रक्रिया झाल्याची उदाहरणे उपलब्ध नाहीत. आम्ही सहा महिने सराव केला आणि शस्त्रक्रिया सहा तास चालली, स्ट्रोकचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये रक्ताभिसरण योग्य नसते आणि मेंदूच्या ज्या भागात हायपोपरफ्युज आहे त्या भागात रक्ताभिसरण आवश्यक असते अशी माहिती डॉ सचिन बलदवा यांनी दिली.
आता अशा अवघड शस्त्रक्रिया सोलापुरात होऊ लागल्याने सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील रुग्ण हे आता पुणे मुंबईकडे जाण्या ऐवजी सोलापुरातच आपला उपचार करून घेत आहेत. सोलापूर हे हॉस्पिटलचे हब होत असून अनेक रुग्णांना सोलापुरातील डॉक्टरांवर विश्वास वाढत चालला आहे.